घरफोडीच्या प्रयत्नात असलेल्या तिघा संशयीतांना अटक
भुसावळ : शहरात रात्रीच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलिसांना तीन जण संशयास्पद हालचाली करताना आढळल्याने आल्याने त्यांना अटक करण्यात आली. एएसआय माणिक सपकाळे हे शनिवारी रात्री 2.10 वाजेच्या सुमारास वरणगाव रोडवरील गोलाणी परीसरात गस्तीवर असताना, एका टपरीच्या आडोशाला अंधारात दोन जण लपून बसल्याचे दिसून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. अमोल काशीनाथ राणे (23, रा. श्रीराम नगर, भुसावळ), यश शशिकांत काटे (वय 20, रा. रेल्वे स्टेशनजवळ अमरावती) अशी त्यांची नावे आहेत तर दुसर्या घटनेत बाजारपेठ पोलिस ठाण्याचे प्रशांत परदेशी हे शनिवारी मध्यरात्री 2.30 वाजेच्या सुमारास जाम मोहल्ला भागात गस्तीवर असताना मशिदीच्या आडोशाला एक जण दडून बसल्याचे दिसून आले. पोलिसांनी चौकशी करुन नाशीर खान बशीर खान (30, रा.जाम मोहल्ला, भुसावळ) त्यास अटक करण्यात आली.




