रावेर पंचायत समितीत शिवराज्याभिषेक दिन साजरा


रावेर : रावेर पंचायत समितीच्या आवारात रविवार, 6 जून रोजी शिवराज्यभिषक दिनानिमित्त भगव्या ध्वजाची गुढी उभारून त्याचे पूजन करण्यात आले व मानवंदना देण्यात आली. यावेळी सभापती कविता कोळी, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

यांची होती उपस्थिती
रावेर पंचायत समितीसह सर्व ग्रामपंचायतीवर 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भगव्या ध्वजाची गुढी उभारून पूजन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे सभापती कविता कोळी व गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, योगेश पाटील, जितेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भगव्या ध्वजाच्या गुढीला सर्व पदाधिकारी व अधिकारी यांनी अभिवादन केले. यावेळी हरलाल कोळी, सहा.गटविकास अधिकारी डी.एच.सोनवणे, चोपडेकर, डी.आर.महाजन व सर्व विभागप्रमुख व सर्व कर्मचारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !