जळगाव जिल्हा सोमवारपासून अनलॉक
जिल्हाधिकार्यांनी काढले आदेश : व्यापार्यांना मोठा दिलासा
जळगाव : जिल्ह्यातील नागरीकांसह व्यापार्यांना मोठा दिलासा मिळाला असून रविवारी सायंकाळी जिल्हाधिकार्यांनी अनलॉकचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान, राज्यात कोरोना रुग्ण संख्येत घट होत असल्याने अनलॉकच्या प्रक्रियेला सुरू झाल्यानंतर राज्यात पाच टप्प्यात अनलॉक करण्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने मध्यरात्री याबाबत नुकतेच नोटीफिकेशन जारी केले होते. दरम्यान, खाजगी क्लासेस व आठवडे बाजार मात्र बंद राहणार आहेत.
रेस्टारंट बारही उद्यापासून होणार सुरू
जिल्ह्यात सोमवार, 7 जूनपासून मॉल्स, थिएटर, जीम, सलून, स्पा, हॉटेल, रेस्टारंट, बार रात्री नऊ वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू होणार असल्याने व्यावसायीकांना मोठा दिलासा मिळाला आहे.



जिल्ह्यात काय-काय राहणार खुले-
अत्यावश्यक सेवा पुरवणारी/अन्य प्रकारची सर्व दुकाने- रात्री नऊ वाजेपर्यंत
शॉपींग मॉल/थिएटर्स/मल्टीफ्लेक्स- 50 टक्के क्षमतेने
हॉटेल/रेस्टारंट/बार- सकाळी नऊ ते रात्री नऊ (50 टक्के क्षमतेने)
सार्वजनिक ठिकाणे/खुली मैदाने/सायकलींग व मॉर्निंग वॉक- सुरू
शासकीय/खाजगी कार्यालये- नियमित सुरू
क्रीडा प्रकार/शुटींग/तत्सम स्पर्धा- सुरू (50 टक्के क्षमतेने)
धार्मिक/सामाजिक/सांस्कृतिक/राजकीय/मनोरंजनात्मक कार्यक्रम- दोन तासांच्या आत (शंभर नागरीकांच्या उपस्थितीत)
लग्न समारंभ- (एकाच वेळी 50 नागरीकांची उपस्थिती)
अंत्यविधी- (केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत)
जीम/सलून/ब्युटी पार्लर/स्पा सेंटर/वेलनेस सेंटर- सुरू
सर्व कंपन्या/औद्योगिक आस्थापना/सर्व निर्मिती करणारे घटक/आस्थापना/ सर्व निर्यात करणार घटक- सुरू
आंतर जिल्हा प्रवास- सुरू
सार्वजनिक वाहतूक/माल वाहतूक- सुरू
सर्व प्रकारचे बांधकामे/ कृषी संबंधित कामे- सुरू
ई कॉमर्स सुविधा- सुरू
सर्व प्रकारच्या बैठका/ग्रामपंचायत/को.ऑप निवडणूक- सुरू

