अनोळखी तरुणाचा किनगावात आढळला मृतदेह


यावल : तालुक्यातील किनगाव येथील एका शेत विहिरीत अंदाजे 25 वर्षीय अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला असून हा तरुण आठवड्यापूर्वी विहिरीत पडला असावा, असा डॉक्टरांचा अंदाज आहे. मृतदेह कुजल्याने अद्याप ओळख पटलेली नाही तर घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले. डिगंबर न्हावी यांच्या शेतातील विहिरीतून रविवारी दुर्गंधी येत असल्याने विहिरीत डोकावून पाहिले असता त्यात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसला. याबाबत यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार व सहकारी आल्यानंतर मृतदेह बाहेर काढला. यावल ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.शुभम तिडके, बापू महाजन यांनी जागेवरच शवविच्छेदन केले.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !