यावलमध्ये पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसची निदर्शने


यावल : पेट्रोल, डिझेलसह गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष तथा रावेर-यावलचे आमदार शिरीष चौधरी, जि.प.चे गटनेते प्रभाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी 11 वाजता शहरातील तीन पेट्रोल पंपावर काँग्रेसच्या वतीने घोषणा देत निर्दशने करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी आमदार चौधरी, जि.प.गटनेते सोनवणे, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील आदींनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत मोदी यांनी सत्तेवर येण्यापूर्वी इंधन दरवाढ कमी करण्याचे आश्‍वासन भारतीयांना दिले मात्र गेल्या सात वर्षात कशाच्याही किंमती कमी तर झाल्याच नाही उलट अर्थचक्र त्यांनी बिघडवल्याचा आरोप करण्यात आला. याप्रसंगी हाजी शब्बीरखान मोहम्मदखान, भगतसिंग पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती लिलाधर चौधरी, पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील, शहराध्यक्ष कदीर खान, नगरसेवक शे.रसुल, शेख समीर, मनोहर सोनवणे, इम्रान पहेलवान, महिला तालुकाध्यक्षा चंद्रकला इंगळे, पंचायत समितीचे माजी सदस्य प्रशांत पाटील, हाजी गफ्फारशाह, अमोल भिरूड, राजू करांडे, अजय बडे, रहेमान शेख नईम, अशफाक शाह, शेख सकलेन, शेख निसार, विक्की गजरे, नाना तायडे, शेख उस्मान, अभिषेक इंगळे, शेख जाकीर, हुसेन बिल्डर आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !