बोदवडला युवक काँग्रेस व युवा सेनेकडून इंधन दरवाढीविरोधात आंदोलन
बोदवड : शहरातील नाडगाव रस्त्यावरील रतन पेट्रोलियम व एस्सार पेट्रोल पंपाबाहेर वाढत्या इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेस व युवासेनेच्या वतीन आंदोलन करण्यात आले. प्रसंगी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे सबके साथ, विश्वासघात असल्याचं सांगत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं. मोदींनी सत्तेत येण्यासाठी प्रत्येक वर्गाला आश्वासने देऊन त्यांची मते घेतली आणि सत्तेत आल्यावर मात्र विश्वासघात केल्याचे ते म्हणाले.
यांचा आंदोलनात सहभाग
या आंदोलनात युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील, काँग्रेस तालूकाध्यक्ष ईश्वर जंगले, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंजाजी पाटील, युवासेना तालुका समन्वयक अमोल व्यवहारे, छावा संघटना तालुकाध्यक्ष गजानन पाटील, उमेश बिजागरे, आनंदराज खोडके, सोमेश्वर पाटील, निलेश जवरे, पराग घोरपडे, मासुम शेख व कार्यकर्ते सहभागी झाले



