कुर्‍हा माध्यमिक शाळेच्या परीसरात वृक्षारोपण


भुसावळ : जागतिक पर्यावरणाच्या दिनानिमित्ताने तालुक्यातील कुर्‍हा येथील माध्यमिक शाळेत आणि ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात महिला बचत गट व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, जळगाव, जनमत प्रतिष्ठान माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान, शिवराज्याभिषेक दिन आणि 5 जून जागतिक पर्यावरण दिन कालानुरूप वेगळ्या पद्धतीनुसार साजरी करा, असे आवाहन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांनी यावेळी केली.

यांची होती उपस्थिती
जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जळगाव शहराध्यक्ष पंकज नाले व निसर्ग पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ अशा संयुक्त विद्यमाने कुर्‍हा गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले. प्रसंगी कुर्‍हा सरपंच व जिल्हा परीषदेचे माजी सदस्य सुरेश आण्णा शिंदे, रघुनाथ आप्पा सोनवणे, राज्य सल्लागार सुरेंद्रसिंग पाटील, शाळेचे मुख्याध्यापक डी.डी.पाटील, शाळेचे अध्यक्ष आप्पासाहेब बडगुजर समाजसेवक गिरीश पवार उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !