किनगावला आजारास कंटाळुन वयोवृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या


यावल : तालुक्यातील किनगाव बु. येथील एका वयोवृद्ध शेतकऱ्याने आजारास कंटाळून आत्महत्या केली. 8 रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. एकनाथ बाबुराव पाटील (८१) असे मयताचे नाव आहे. एकनाथ पाटील हे ७ जुन रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आपल्या शेतात जावुन येतो, असे सांगुन बाहेर पडले मात्र घरी परतले नाहीत. घरच्या मंडळींनी व नातेवाईकांनी शेतात जावुन त्यांचा शोध घेतला मात्र ते मिळुन आले नाही. मंगळवार, ८ मे रोजी त्यांच्या कुटुंबाच्या मंडळीने पुनश्च शोध घेतला असता कासारखेडा शिवारातील रवींद्र रामकृष्ण पाटील ( टेलर ) यांच्या शेतातील विहीरीवर एकनाथ पाटील यांची काठी दिसुन आली व एकनाथ पाटील यांचा मृतदेह पाण्यात तरंगतांना दिसून आला. याबाबत यावल पोलिसात मयताचा मुलगा हेमराज एकनाथ पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची
नोंद करण्यात आली. एकनाथ बाबुराव पाटील यांना बऱ्याच दिवसांपासुन पोटदुखीचा आजार जडला होता , त्यामुळे त्यांना पोटदुखीच्या आजारातुन होणारा त्रास असहाय्य झाल्याने अखेर त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेचा तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे .


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !