मुंबईत मुसळधार पाऊस : आठ विशेष रेल्वे गाड्या उशिराने धावणार
भुसावळ : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने विशेष गाड्यांमध्ये परीवर्तन करण्यात आले असून आठ गाड्या नियोजीत वेळेपेक्षा उशिराने धावणार आहे.
मुंबईहून 9 रोजी सुटणार्या या गाड्या उशिराने धावणार-



02362 मुंबई आसनसोल विशेष नियोजित वेळेपेक्षा 0650 तास उशिराने सुटेल
02598 मुंबई गोरखपूर अंत्योदय नियोजित वेळेपेक्षा 04.30 तास उशिराने सुटेल
02322 मुंबई हावडा विशेष वाया प्रयागराज नियोजित वेळेपेक्षा 03.45 तास उशिराने सुटेल
03202 लोकमान्य टिलक टर्मिनस-पटना विशेष नियोजित वेळेपेक्षा चार तास तास उशिराने सुटेल
02107 लोकमान्य टिळक टर्मिनस-लखनऊ विशेष नियोजित वेळेपेक्षा 03.00 तास उशिराने सुटेल
01081 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष नियोजित वेळेपेक्षा 03.00 तास उशिराने सुटेल
02141 लोकमान्य टिळक टर्मिनस-पाटलीपूत्र विशेष नियोजित वेळेपेक्षा 03.30 तास उशिराने सुटेल
02193 मुंबई वाराणसी विशेष गाडी 10 रोजी सुटणारी नियोजित वेळेपेक्षा 03.50 तास उशिराने सुटेल

