राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम


रावेर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त रावेर शहरात झेंडा वंदन करून वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त रावेर शहरात झेंडा वंदन करण्यात आले तसेच पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गोटू शेट, प्रल्हाद बोंडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमूद शेख, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, प्रवीण चौधरी, भागवत चौधरी, इम्रान शेख, कामील शेख, कुणाल महाले, प्रणीत महाजन, शब्बीर शेख, विलास ताठे, एल.डी.निकम, सुपडू शेख, पिंटू महाजन, इरफान शेख व राष्ट्रवादी व पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !