वरणगावात राष्ट्रवादी वर्धापनदिनानिमित्त वृक्षारोपण


वरणगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले तसेच वृक्षाचे संगोपन व संवर्धनाची जबाबदारी निश्चित करण्यात आली. वरणगाव बसस्थानक चौकात ध्वजारोहण करण्यात आले व केक कापून लाडू वाटप करण्यात आले. अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जळगाव जिल्ह्याच्या पदाधिकार्‍यांसह महिला पदाधिकारी तसेच भुसावळ तालुका व वरणगाव शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !