मसाका कामगारांचे थकित वेतन आठवड्याभरात द्या


वंचित बहुजन आघाडीची मागणी ; तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

न्हावी : मधुकर साखर कारखान्यातील कामगारांचे थकीत पी.एफ व पगार त्वरीत देण्यात यावेत अन्यथा दहा दिवसानंतर चेअरमन शरद महाजन यांच्या निवासस्थानी वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, यावल तालुकाध्यक्ष मनोज कापडे यांच्या नेतृत्वात मसाका चेअरमन शरद महाजन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले आहे.

हक्काच्या पैशांपासून कामगार वंचित
निवेदनाचा आशय असा की, मधुकर सहकारी साखर कारखान्यात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना पी.एफ व पगार थकबाकी असल्यामुळे त्यांच्या हक्काचा पैसा मिळत नाही. कर्मचार्‍यांचा मार्च 2020 मधील पी.एफ दोन कोटी 45 लाख 730 रुपये, कायम, हंगामी आणि ट्रेनी कर्मचार्‍यांचा पगार 16 कोटी 56 लाख 83 हजार 385 रुपये, फायनल ग्रँच्युईटी व पगार 9 कोटी 35 लाख 27 हजार 114 रुपये, बोनस व सानुग्रह अनुदान 29 कोटी तीन लाख 28 हजार 580 रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचार्‍यांचे देणे आहे. वेतनाअभावी कर्मचार्‍यांची उपासमार होत असून, त्यांच्या हक्काच्या रक्कमा त्वरीत देण्यात याव्या, अशी मागणी वंचित आघाडीतर्फे करण्यात आली. मागणी पूर्ण न झाल्यास वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी चेअरमन शरद महाजन यांच्या निवासस्थानी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडतील इसा अशारा इशारा देण्यात आला आहे. प्रसंगी आय.टी सेल जिल्हा प्रमुख सचिन बार्‍हे, जिल्हा सचिव दीपक मेघे, फैजपूर शहराध्यक्ष सोनू वाघुळदे, देवदत्त मकासरे, अमोल तायडे, धीरज मेघे आदी कामगार उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !