मुंबई-अमृतसर, कोल्हापूर-हजरत निजामुद्दीन दरम्यान विशेष गाड्या
भुसावळ : प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाने मुंबई-अमृतसर, कोल्हापूर- हजरत निजामुद्दीन, पुणे-सांतरागाछी/हटिया अशा या विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
सीएसटी-अमृतसर
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-अमृतसर ही 01057 क्रमांकाची गाडी 16 जूनपासून दररोज रात्री 11.30 वाजता सुटेल. ती तिसर्या दिवशी दुपारी 4.15 वाजता अमृतसरला पोहोचेल. मार्गात ही गाडी ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, कसारा येथे थांबेल. 01058 क्रमांकाची अमृतसर-मुंबई ही गाडी 19 जूनपासून दररोज सकाळी 8.45 वाजता सुटून तिसर्या दिवशी रात्री 12.05 वाजता मुंबई येथे येईल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, कसारा, नाशिक, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, सावदा, रावेर, बर्हाणपूर, नेपानगर, खंडवा येथे थांबा आहे. गाडी क्रमांक 02047 कोल्हापूर-हजरत निजामुद्दीन विशेष अतिजलद साप्ताहिक गाडी 6 जुलैपासून कोल्हापूर येथून दर मंगळवारी सकाळी 9.10 वाजता सुटेल. ती हजरत निजामुद्दीन येथे दुसर्या दिवशी दुपारी 5.50 वाजता पोहोचेल. 02048 ही गाडी जुलैपासून हजरत निजामुद्दीन येथून दर गुरुवारी सकाळी 5.10 वाजता सुटून दुसर्या दिवशी दुपारी 1.30 वाजता कोल्हापूर येथे येईल.



पुणे-हटिया विशेष साप्ताहिक गाडी
08617 ही विशेष साप्ताहिक गाडी 11 ते 25 जून या काळात तीन फेर्या करेल. दर शुक्रवारी पुणे येथून सायंकाळी 5.40 वाजता सुटून तिसर्या दिवशी रात्री 12.20 वाजता हटिया येथे पोहोचेल. तर 08618 गाडी 9 ते 23 जून या काळात तीन फेर्या करेल. दर बुधवारी हटिया येथून रात्री 11.55 वाजता सुटून तिसर्या दिवशी सकाळी 9.05 वाजता पुणे येथे पोहोचेल. दौंड कॉड लाइन, नगर, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा थांबा आहे. 02048 ही गाडी 8 जुलैपासून हजरत निजामुद्दीन येथून दर गुरुवारी सकाळी 5.10 वाजता सुटून दुसर्या दिवशी दुपारी 1. 30 वाजता कोल्हापूर येथे येईल, असे प्रशासनाने सांगितले.
पुणे-सांतरागाछी विशेष अतिजलद गाडी
02491 ही विशेष अतिजलद साप्ताहिक गाडी 12 ते 26 जून या काळात तीन फेर्या करणार आहे. पुणे येथून दर शनिवारी सायंकाळी 5.40 वाजता सुटून तिसर्या दिवशी सकाळी 5.15 वाजता सांतरागाछी येथे पोहोचेल. या गाडीला दौंड, नगर, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर येथे थांबा आहे.

