इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात 90 लाख स्किल्ड वर्करची गरज


डॉ.गिरीष कुळकर्णी : गाडगेबाबा अभियांत्रिकीत बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शंकांचे ऑनलाईन निरसन

भुसावळ : इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या आरेखनापासून ते याच्या उपयोगापर्यंत जगभरात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची मागणी वाढल्याने या क्षेत्रात निर्मितीसाठी शक्यता वाढल्या आहेत. देशात या क्षेत्रात स्किल्ड अभियंत्यांची व कामगारांची अपेक्षेपेक्षा कमतरता आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात रोजगारासाठी व्यापक नव्या संधी मिळतील. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग करणार्‍यांना यात उत्तम संधी आहेत असे अभियांत्रीकी क्षेत्रात शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या भावी अभियंत्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करतांना डॉ.गिरीष कुळकर्णी यांनी सांगितले.

बारावीचे वर्ष आयुष्याला कलाटणी देणार
डॉ.कुलकर्णी म्हणाले की, बारावीचे वर्ष आयुष्याला कलाटणी देणारे ठरते, करीयरचा योग्य निर्णय न घेतला गेल्यास मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातील संधीचे मार्गदर्शन करतांना ते बोलत होते, यादरम्यान त्यांच्या शंकांचे निरसन त्यांनी केले. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अनुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम हार्डवेअर क्षेत्रात 2022 च्या शेवटपर्यंत 90 लाख स्किल्ड वर्करची गरज असेल. इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात टेलिव्हिजन, संगणक, टेलिकम्युनिकेशन व इतर उत्पादनाची निर्मिती केली जाते. त्यामुळे भविष्यातील संधीचा फायदा घेण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहनही डॉ.कुळकर्णी केले.



अनुभवानंतर मिळणार चांगले पॅकेज
या क्षेत्रात फ्रेशरला 30 ते 35 हजार रुपये प्रतिमहाचे पॅकेज मिळू शकते. काही वर्षांच्या अनुभवानंतर हे पॅकेज 4 ते 5 लाख रुपये वार्षिकपर्यंत असू शकते. बारावीत फिजिक्स, केमिस्ट्री/बायोलॉजी आणि मॅथ्स विषय गरजेचा आहे. यानंतर विद्यार्थी सीईटी किंवा जेईई मेनच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम इंजिनिअरिंगच्या बीटेक कोर्सला प्रवेश घेऊ शकतात अशी माहिती प्रा. धिरज पाटील यांनी दिली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !