आंदलवाडीच्या तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या
रावेर : तालुक्यातील आंदलवाडी येथील विशाल गोपाळ कोळी (25) या नववाहिता तरुणाने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजु शकलो नाही. निंभोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आंदलवाडी गावाजवळच नविन बोगद्याचे काम सुरू असून पहाटेच्या वेळी तरुणाने रेल्वेखाली झोकून देत जीवन संपवले. महिनाभरापूर्वीच पूरी गोलवाडे येथील तरुणीशी तरुणाचा विवाह झाला होता.




