सावखेडासीमला हिवताप प्रतिरोध मोहीमेंतर्गत जनजागृती


दहिगाव : सावखेडासीम प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्‍या विविध गावांमध्ये आरोग्य विभागामार्फत हिवताप प्रतिरोध जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण जून महिना हिवताप प्रतिरोध महिना साजरा केला जात असून गावा-गावात सर्वेक्षण सुरू आहे. कोरोनासोबतच कीटकजन्य व जलजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभाग तालुक्यात सज्ज झाला आहे. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार व जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुक्यात तालुका आरोग्याधिकारी डॉ.हेमंत बर्‍हाटे, यावल-रावेर तालुका हिवताप पर्यवेक्षक विजय नेमाडे यांच्या वतीने 1 ते 30 जून या दरम्यान हिवताप प्रतिरोध महिना साजरा करून जनजागृती करण्यात येत आहे.

आरोग्य सेवक व आशा सेविकांकडून उपाययोजना
या अनुषंगाने सावखेडासीम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नसीमा तडवी, डॉ.गौरव भोईटे, आरोग्य सहाय्यक एल.जी.तडवी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ कल्पेश पाटील यांनी आपल्या कार्यक्षेत्रात हिवताप प्रतिरोध जनजागृती मोहीम सुरू केली. यात दहिगावात राजेंद्र बारी, सावखेडा सिम येथे संजय तडवी, मोहराळा येथे बालाजी कोरडे, सातोद व कोळवद येथे भूषण पाटील तर आदिवासी व अतिदुर्गम भागात वसलेले गाडर्‍या-जामन्या येथे अरविंद जाधव हे सर्व आरोग्य सेवक व आशा सेविका उपाययोजना व जागृतीसाठी प्रयत्न करत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !