रेल कामगार सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त वृक्षारोपण
भुसावळ : रेल कामगार सेनेच्या 22 व्या वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. पर्यावरणाचे महत्व ओळखून व वर्धापनदिनाचे औचित्य साधून वड, पिंपळ, लिंब अश्या 11 वृक्ष लावण्यात आली व वृक्ष संगोपनाची जवाबदारी रेल कामगार सेनेने घेतली. केंद्रीय अध्यक्ष शिवसेना नेते माजी खासदार आनंदराव अडसुळ, दिवाकर देव, संजय जोशी, नरेंद्र शिंदे, स्वप्नील झेमसे यांचा संदेश वाचून दाखवण्यात आला व येणार्या मान्यताप्राप्त निवडणुकीत रेल कामगार सेनेला जास्तीत जास्त विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा, योगेश माळी, प्रदीप भुसारे, एम.के.शहा, प्रकाश करसाळे, अरविंद थोरात, शेख शकील, तम्मा पहेलवान, अब्दुल अजीज, पंकज ठाकरे, मंगेश शेलोडे, रणजीत चौधरी, अर्जुन व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



