ई-ठिबक प्रणाली वेगळी करण्यासाठी प्रयत्न करणार : आमदार शिरीष चौधरी


फैजपूरात आमदारांच्या उपस्थितीत रावेर-यावलची खरीप आढावा बैठक

फैजपूर : रावेर-यावल तालुक्याची कृषी संबंधित मान्सूनपूर्व खरीप हंगाम बैठक आमदार शिरीष चौधरी यांनी प्रांताधिकारी कैलास कडलग व रावेरच्या तहसीलदार उषारणी देवगुणे यांच्या उपस्थितीत घेतली. या बैठकीस रावेर-यावल अशा दोन्ही तालुक्यातील कृषी अधिकारी, कृषी विक्रेते संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

यांची बैठकीला उपस्थिती
यावेळी यावल तालुका कृषी अधिकारी जाधव, पंचायत समिती कृषी अधिकारी दिनेश कोते, रावेरचे तालुका कृषी अधिकारी विजय भामरे, पंचायत समिती कृषी अधिकारी, एल.ए.पाटील, रावेर अ‍ॅग्रो डीलर्स असो.चे अध्यक्ष सुनील कोंडे, यावलचे अ‍ॅग्रो डीलर्सचे अध्यक्ष मनोज वायकोळे, युवराज महाजन, राहुल पाटील, एकनाथ महाजन, श्रीपाद जंगले, डॉ.जी.एम बोंडे, राकेश जैन, भूषण चौधरी यांच्यासह शशांक पाटील, चंद्रकांत भंगाळे यांच्यासह दोन्ही तालुक्यातील कृषी सहाय्यक व कर्मचारी उपस्थित होते. यावल तालुका कृषी अधिकारी जाधव व रावेर तालुक्यारा विजय भामरे यांनी यावल व रावेर तालुक्याचा आढावा सांगितला. त्यात पिकनिहाय स्थिती तसेच विविध योजनांची माहिती दिली. पंचायत समिती यावलचे दिनेश कोते व रावेरचे एल.ए.पाटील यांनी दोन्ही तालुक्यातील खतांची आकडेवारी तसेच उपलब्धता व मागणी तसेच खतांची कमतरता याबाबत माहिती दिली.रावेर असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कोंडे यांनी खतांच्या पॉस मशीनमधून एका शेतकर्‍यासाठी 50 बॅग अडचणीची ठरत असल्याचे सांगितले सोबतच कापूस बियाणे उशिरा विक्रीमुळे नुकसान होऊन परराज्यातून कापूस बियाणे आल्याने नुकसान झाल्याचे सांगितले. यावेळी आमदार शिरीष चौधरी यांनी याबाबत शेतकरी, अधिकारी व कृषी विक्रेते या तिन्ही घटकांनी एकत्र बसून माहिती द्यावी व त्याबाबत आपण पाठपुरावा करू असे सांगितले. यावेळी रावेर तालुक्याला युरीयाचा बफर स्टॉक मिळाल्याबद्दल आमदार शिरीष चौधरी यांचे रावेर असोसिएशनने आभार मानले तर यावल तालुकाध्यक्ष मनोज वायकोळे यांनीही बफर स्टॉकसाठी निवेदन दिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !