पुण्यासह जबलपूर दरम्यान विशेष अतिजलद गाड्या धावणार
भुसावळ : रेल्वेने पुणे व जबलपूर दरम्यानच्या विशेष अतिजलद (साप्ताहिक) गाड्यांच्या धावण्याचा कालावधी व वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
या गाड्यांचा विस्तार
02131 पुणे-जबलपूर विशेष (साप्ताहिक) गाडी 5 जूनपासून दर सोमवारी पुणे येथून 11.30 वाजता सुटेल व जबलपूरला दुसर्या दिवशी सहा वाजता पोहोचेल. 02132 जबलपूर-पुणे विशेष (साप्ताहिक) गाडी 4 जूनपासून 1 ऑगस्टपासून दर रविवारी जबलपूर येथून 1.50 वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसर्या दिवशी 06.25 वाजता पोहोचेल. या गाडीला दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, हरदा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर आणि मदन महल स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक द्वितीय वातानुकूलित, पाच तृतीय वातानुकूलित, नऊ शयनयान, दोन द्वितीय आसन श्रेणी बोगी जोडण्यात येणार आहे. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.



