भाजपच्या उपोषणाची मात्रा लागू : 15 दिवसांच्या आत कामगारांना कामावर घेण्याचे आश्वासन


आमदार सावकारे, खासदार खडसे यांनी दीपनगरच्या अधिकाऱ्यांना खडसावले : स्थानिक कामगारांना कामावर घेण्याची अपेक्षा

भुसावळ : दीपनगर प्रकल्पातून मधून कमलाकर मराठे, तेजस जैन यांच्यासह २५ कंत्राटी कामगारांना विनाकारण मनमानी पद्धतीने ०२ वर्षापासून कामावरून कमी करण्यात आल्याने या कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे, या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावे या मागणीसाठी तसेच वरणगाव शहरातील तरुणांना दीपनगरमध्ये रोजगार द्यावा तसेच टेंडर प्रक्रियेमध्ये अनियमितता असून अनेक काम न करता कोट्यवधी रुपयांची केलेल्या भष्ट्राचाराची चौकशी करावी या मागणीसाठी भाजपातर्फे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह कमलाकर मराठे, तेजस जैन, संदीप महाजन, हर्षल पाटील, उल्हास पाटील, भाजपा शहरध्यक्ष सुनील माळी गोलू राणे, ए.जी.जंजाळे, भाजयुमोचे शहराध्यक्ष संदीप भोई, महिला मोर्चा अध्यक्षा प्रणिता पाटील चौधरी यांच्यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सोमवारी आमरण उपोषण केले. भाजपच्या आंदोलनानंतर अधिकाऱ्यांनी 15 दिवसांच्या आत कामगारांना कामावर घेण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले.

खासदार-आमदारांची भेट
सोमवारी दुपारी १२ वाजता खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे, ६६० मे.वॅट प्रकल्पाचे प्रभारी मुख्य अभियंता महाजन, ५०० मे.वॅटचे खंडारे यांच्यासोबत उपोषणस्थळी आले. यावेळी खासदार रक्षा खडसे व माजी मंत्री संजय सावकारे यांनी दीपनगर प्रकल्पातून कमी केलेल्या मुलांना १५ दिवसाच्या आत दीपनगर प्रशासनाने कामावर घ्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. मुख्य अभियंता श्खंडारे व महाजन यांनी १५ दिवसात कामगारांना कामावर घेतो, असे ठोस आश्वासन आंदोलकांना दिले. यावेळी माजी मंत्री संजय सावकारे यांनी कमलाकर मराठे, तेजस जैन, उल्हास पाटील, संदीप महाजन, हर्षल पाटील, शिवा पवार यांना निंबु पाणी दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी कामगार नेते मिलिंद मेढे , गजानन वंजारी योगेश माळी, जावेद शहा, डॉ. सादिक, डॉ.प्रवीण चांदणे, कृष्णा माळी, संदीप माळी, आकाश निमकर, डी.के.खाटीक, संजय बेदरकर, गणेश चौधरी, पप्पू ठाकरे, शंकर पवार, हितेश चौधरी, महिला आघाडी अध्यक्ष प्रणिता पाटील चौधरी, राहूल जंजाळे, नरेंद्र बावणे, संजय बेदरकर, जयेश कपाटे, नत्थु पवार, शंकर पवार, साबीर कुरेशी, अशपाक खाटीक आदी उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !