भुसावळातील रस्त्यांची माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली पाहणी
दर्जेदार व वेळेवर काम करण्याची कंत्राटदाराला तंबी
भुसावळ : शहरातील वर्दळीच्या जळगाव रस्त्याची सोमवारी राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी केली. रस्त्याचे काम अतिशय दर्जेदार पद्धतीने करावे, अशी सूचना वजा तंबी त्यांनी याप्रसंगी कंत्राटदारांला दिली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक प्रा.सुनील नेवे, पुरुषोत्तम नारखेडे, बोधराज चौधरी, वसंत पाटील, शफी पहेलवान, देवा वाणी, किरण कोलते, महेंद्रसिंग ठाकूर, माजी नगराध्यक्ष विजय चौधरी, दिनेश नेमाडे, मुकेश पाटील, अमोल इंगळे, मुकेश गुंजाळ, राज खरात, प्रशांत नरवाडे, संदेश सुरवाडे, अनिकेत पाटील, शाम भारंबे, एजाज खान, उसामा खान, पृथ्वीराज पाटील, यशांक पाटील, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.



