रावेरात तलवार हल्ला : एक जण जखमी
रावेर : महिलेला अश्लिल शब्द बोलण्याच्या कारणावरून एकाला शिविगाळ करून तलवारीने वार करून जखमी करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री घडली . याप्रकरणी रावेर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर माहिती अशी की , राजू देवराम चौधरी ( ५५ , रा.संभाजी नगर रावेर) याने पुष्पाबाई संतोष मराठे यांनी अश्लिल शब्द बोलण्याच्या कारणावरून पुष्पाबाई यांचा मुलगा तथा संशयीत आरोपी आरोपी रविंद्र संतोष मराठे (रा . संभाजी नगर) याने रागाच्या भरात तलवारीने राजू देवराम चौधरीवर तलवारीने वार करून गंभीर जखमी केले व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली. जखमीस खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे . जखमी राजू देवराम चौधरीचा भाऊ गणेश देवराम चौधरी यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात संशयित आरोपी रविंद्र संतोष मराठे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहे .



