कोरोना रुग्णांचे वाढीव बिल केले परत


रीदम कोविड सेंटरमधील प्रकार ; भाजप सहाय्यता समितीचा पाठपुरावा

भुसावळ : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मोठ्या प्रमाणावर उद्रेक दिसून आला. याचा गैरफायदा घेत खाजगी रुग्णालयात रुग्णांकडून अवास्तव बीलं आकारण्यात आले होते. या संदर्भात भाजप संचालित कोरोना योध्दा सहाय्य समितीच्या पाठपुराव्याने रुग्णालयाने आकारलेले जास्तीचे बील परत करण्यात आले आहे.

जिल्हाधिकार्‍यांकडे केली तक्रार
शहरातील कौलसिंग पाटील आणि वत्सला पाटील यांना कोरोना संक्रमण झाल्याने त्यांनी रिदम कोविड सेंटरमध्ये उपचार घेतला होता. उपचाराअंती कौलसिंग पाटील हे मयत झाले तर वत्सला पाटील या सुखरूप घरी आल्या. या पाच दिवसामधील त्यांचे बिल अनुक्रमे 50 हजार 571 आणि 40 हजार 901 असे होते. या दोघांचे एकूण बिल 91 हजार 472 बिल अदा करण्यात आले. यानंतर भाजप सहाय्य समितीचे केतन पाटील यांनी पाटील परिवाराची भेट घेतली असता, त्यांनी वाढीव बिलासंबंधी माहिती दिली. याबाबत लेखी तक्रार करोनायोद्धा सहाय्य समितीचे अध्यक्ष डॉ. नितु पाटील यांच्याकडे करत सर्व कागदपत्रे सोबत दिली.




वाढीव रक्कमेचे चेकने पैसे केले परत
डॉ. नितु पाटील यांनी वाढीव बील अर्जाचा पाठपुरावा जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे केला. याबाबत आमदार संजय सावकारे यांनीदेखील आक्षेप निवारण समितीशी चर्चा कर, बिल पडताळणीबद्दल सुचविले. सरतेशेवटी कोरोना योद्धा सहाय्य समितीचे केतन पाटील यांच्या उपस्थिती पाटील परीवाराला नऊ हजार आणि नऊ हजार 800 या रकमेचे दोन धनादेश परत करण्यात आले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !