स्व.बाळासाहेबांनी केलेले कार्य पुढे चालू ठेवणे हीच त्यांना आदरांजली


प.पू.जनार्दन हरीजी महाराज : स्व.बाळासाहेब चौधरींना जयंतीनिमित्त आदरांजली

फैजपूर : यावल-रावेर तालुक्याचे भाग्यविधाते स्व.बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी आपल्या हयातीत सुरू केलेले कार्य पुढे चालू ठेवणे हीच खरी त्यांना आदरांजली, श्रद्धांजली ठरू शकते, असे मत महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी व्यक्त केले. मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आयोजित बाळासाहेबांच्या 93 व्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी अखिल भारतीय संत समितीचे संयुक्त महामंत्री श्री राधे राधे बाबा, येथील खंडेराव देवस्थानचे महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज, महानुभाव पंथाचे श्री सुरेश शास्त्री मानेकर बाबा, शास्त्री भक्ती किशोर दासजी महाराज या संत मंडळीसह परीसरातील बाळासाहेबांवर प्रेम करणारे सर्व चाहते उपस्थित होते. या छोटेखानी कार्यक्रमात जनता शिक्षण मंडळाचे सचिव प्रभात दादा चौधरी यांनी स्वर्गीय बाळासाहेबांनी केलेल्या कार्य यावर प्रकाशझोत टाकला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण अर्पण करण्यात आली.




समाजाभिमुख संस्था टिकून ठेवणे काळाची गरज
महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी आपल्या मनोगतात पुढे सांगितले की, स्व.बाळासाहेबांनी परीसरात शिक्षण संस्था त्याअंतर्गत विविध महाविद्यालय, साखर कारखाना आदी समाजाभिमुख उपयुक्त संस्था स्थापन केल्या. त्या पुढे टिकून ठेवणे ही काळाची गरज असून हीच त्यांना श्रद्धांजली आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !