वरणगावातील स्वस्त धान्य दुकानाचे लवकरच होणार स्थलांतर
वरणगाव : वरणगाव महामार्गावर शेतकी संघ असून शेतकी संघाच्या नावे स्वस्त धान्य दुकान आहे. नागरीकांना धान्य घेण्यासाठी एक किमी अंतरावरून धान्य घेण्यासाठी भवानी नगर, भोई वाडा, कोळी वाडा, धनगर वाडा, संत जगनाडे चौक, खाटीक वाडा, ईमली वाडा, मंबु वाडा, विकास कॉलनी लगतच्या शिधापत्रिका (रेशनकार्ड) धारकांना धान्य घेण्यासाठी वरणगाव शेतकी संघालगत असलेल्या स्वस्त धान्य दुकानात यावे लागत असल्याने त्यांची गैरसोय होते. या धान्य दुकानाचे प्रभागातच जवळपासच्या ठिकाणी स्थलांतर करण्यात यावे, अशी मागणी तहसीलदार दीपक धीवरे यांच्याकडे करण्यात आली. या मागणीसंदर्भात शेतकी संघाचे चेअरमन यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून लवकरात लवकर या भागातील नागरीकांसाठी स्वस्त धान्य दुकानाचे स्थलांतर करण्यात येणार असल्याचे तहसीलदार म्हणाले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर.पाटी, तालुकाध्यक्ष दीपक हरी मराठे, तालुका उपाध्यक्ष प्रकाश नारखेडे, विष्णु खोले, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पप्पू जकातदार, युवक कार्याध्यक्ष विनायक शिवरामे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



