भुसावळातील प्रभाग 15 मधील समस्या सोडवण्याची अपेक्षा


भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असून गटारींवर ढाबे तुटल्यानंतरही पालिका प्रशासनाने अद्यापही दखल घेतली नसल्याने नागरीकांना मोठा मनस्ताप सोसावा लागत आहे. निवडणुकीच्या साडेचार वर्षानंतर अद्यापही नगरसेवक दिसले नसल्याचे रहिम कुरेशी यांनी पालिका प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. प्रभागातील शौचालयांची प्रचंड दुरवस्था झाली असून पालिका प्रशासनाने किमान आतातरी शौचालयांची दुरवस्था थांबवावी, अशी अपेक्षा काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रहिम कुरेशी यांनी व्यक्त केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !