ग्रामपंचायत हे ग्रामविकासाचे मोठे केंद्र : आमदार संजय सावकारे


भुसावळ : ग्रामपंचायत हे ग्रामविकासाचे सर्वात मोठे केंद्र असून सरपंच व सदस्यांनी मनावर घेतले तर गावाचा सर्वांगीण विकास सहज होऊ शकतो, असे प्रतिपादन भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी भानखेडे येथे पेव्हर ब्लॉकच्या लोकार्पण प्रसंगी केले. भुसावळ तालुक्यातील जोगलखेडे- भानखेडे येथे आमदार निधीतून पेव्हर ब्लॉकचे काम पूर्ण झाले. त्याचे लोकार्पण आमदारांच्या हस्ते झाले.

यांची होती उपस्थिती
यावेळी भुसावळ तालुका सरपंच परीषदेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, अतुल झांबरे, विकास पाचपांडे, सरपंच सारीका पाटील, उपसरपंच जानकीराम कोळी, ग्रामपंचायत सदस्य लाला सोनवणे, गजेंद्र पाटील, रेखा सोनवणे, माधुरी पाटील, गजाबाई सोनवणे, माजी सरपंच पंकज पाटील, एकनाथ पाटील, ग्रामसेविका प्रतिभा तायडे, नामदेव पाटील, अमोल पाटील, छोटू पाटील, रामचंद्र पाटील, जोगलखेडे मुख्याध्यापक जितेंद्र झांबरे व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन भानखेडे शाळेचे मुख्याध्यापक गणेश फेगडे यांनी केले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !