भुसावळात खंडित वीजपुरवठा : नवशक्ति संकुलात व्यापार्‍यांचे हाल


भुसावळ : गेल्या चार महिन्यांपासून सततच्या फेज जाण्याच्या समस्येमुळे जामनेर रोडवरील नवशक्ति आर्केडमधील व्यापारी व परीसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. खंडित विजेमुळे व्यवसायावर परीणाम होत आहे. तक्रार नोंदवण्यासाठी फोन केल्यास नेहमीप्रमाणे फोन हा व्यस्त येतो त्यामुळे तक्रारही कित्येकदा नोंदवता येत नाही. वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी अनेकदा संपूर्ण दिवस लागत असल्याची व्यापार्‍यांची ओरड आहे. व्यापार्‍यांना ऑनलाइन तक्रार नोंदवण्याचा पर्याय निवडावा लागतो पण त्यातूनही लवकर समाधान मिळत नाही. आधीच लॉक डाऊनमुळे मार झेलत असलेल्या व्यापार्‍यांना अनलॉक झाल्यानंतरही विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे यामुळे परीसरातील व्यापार्‍यांमध्ये प्रचंड संताप आहे. वीज वितरण कंपनीने उपाययोजना करून अखंडित वीजपुरवठा द्यावा, अशी सर्व व्यापार्‍यांची आणि परीसरातील रहिवाश्यांनी मागणी आहे. या आशयाचे निवेदनदेखील लवकरच मुख्य अभियंत्याना दिले जाणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !