तापी नदीकाठी आढळला अनोळखीचा मृतदेह


रावेर : रावेर पोलिस स्टेशन हद्दीतील तापी नदीकाठी अनोळखी इमसाचा मृतदेह आढळला असून अद्याप ओळख पटली नसल्याने ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.नांदुपिंप्री तापी पुलाखालील धुरखेडा गावच्या शिवारात एक 30 ते 35 वयोगटातील तरुणाचा मृतदेह मृतदेह आढळला आहे. रंग सावळा, केस काळे, चेहरा गोलसर, बांधा मजबूत, उंची सुमारे 165 सेंटीमीटर, उजव्या हाताचे मनगटावर इंग्रजीत एसएम गोंदलेले आहे. अंगात निळसर रंगाची जीन्सची फुलपॅन्ट व निळ्या रंगाचे फुलबायांचे पांढरे, लालसर बारीक चौकडी शर्ट आहे. घटनास्थळी निरीक्षक रामदास वाकोडेव उपनिरीक्षक मनोहर जाधव यांनी भेट दिली. ओळख पटत असल्यास उपनिरीक्षक मनोहर जाधव यांच्याशी मो.9049822516 यांच्याशी संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !