बोदवडला फिरत्या न्यायालयात 31 केसचा निपटारा
बोदवड : महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणामार्फत फिरत्या लोकन्यायालय (मोबाईल व्हॅन) चे आयोजन करण्यात आले. न्यायाधीश एस.डी.गरड हे पॅनल प्रमुख म्हणून उपस्थित होते. बोदवड वकील संघाचे अॅड.अर्जुन पाटील व अॅड.के.एस.इंगळे पॅनल सदस्य म्हणून होते. एकूण 31 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला व त्यातून 22 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. यशस्वीतेसाठी बोदवड न्यायालयातील कर्मचारी सहा.अधीक्षक जे.बी.पाटील, एस.पी.आठवले, एस.एस.परसे, बाविस्कर, जाधव, थोरात, सोनवणे आदींनी प्रयत्न केले. यावेळी जिल्हाभरातून तसेच बोदवड तालुका व परिसरातील वकील मंडळी तसेच बोदवड येथील प्रतिष्ठित व्यापारी तसेच मोठ्या प्रमाणावर पक्षकार उपस्थित होते.




