डंपर-ॲपे रीक्षा अपघात ; दोघांना अटक


यावल : चोपडा रस्त्यावर रोजी वाळू वाहतूक करणारा डंपर व ॲपे रीक्षात अपघात झाल्याची घटना 7 जून रोजी घडली होती. या अपघातात रीक्षा चालकासह अन्य एक जण जखमी झाला होता. या अपघात प्रकरणी डंपर मालक व चालक या दोघांना गुरूवारी यावल पोलिसांनी अटक केली. 7 जुनच्या मध्यरात्रीनंतर चोपडा रस्त्यावरील महाजन पेट्रोल पंपाजवळ वाळु वाहतुक करणारे डंपर ( क्रमांक एम. एच. १९ सी. वाय. ३४२६)
व ॲपे रीक्षा (क्रमांक एम. एच. १९ ए.ई. ६४९३) यांच्यात अपघात झाला होता. या अपघातात रीक्षा चालक प्रमोद नारायण तायडे (रा.केऱ्हाळा, ता. रावेर) व तुषार वाघुळदे (रा. जळगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर डंपर चालक पसार झाला होता. अपघात प्रकरणी यावल पोलिसात पोलिस कर्मचारी राजेश सुभाष महाजन यांच्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गुरूवारी डंपर मालक महेंद्र पांडूरंग पाटील (रा.पिंप्राळा जळगाव) व चालक मुस्ताक दाऊद पिंजारी (रा.जळगाव) या दोघांना अटक केली. या अपघातातील ॲपे रीक्षा चालकाची प्रकृती अद्याप गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तपास सहा. फौजदार नितीन चव्हाण करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !