रावेर तालुक्यात 813 घरकुलांचे काम अपूर्ण
रावेर : ग्रामीण भागात 813 घरकुलांचे काम अपूर्ण आहे. गेल्या पाच वर्षापासून शासकीय घरकुल योजनेचे काम सुरू असून आतापर्यंत 81 टक्के घरकुले तालुक्यात पूर्ण झाली आहेत तर अद्याप ब च्या यादी वरील घरकुलांची कामे सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. रावेर ग्रामीण भागात केंद्र व राज्य सरकारच्या योजनेंतर्गत 813 घरकुलांचे अपूर्ण आहे. प्रधानमंत्री आवास योजनेची तालुक्यात दोन हजार 609 घरकुले मंजूर असून यातील 316 घरकुले अद्याप अपूर्ण आहे. शबरी आवास योजनेंतर्गत 388 घरकुले मंजूर असून 80 घरकुले अपूर्ण आहेत. रमाई आवास योजनेंतर्गत एक हजार 354 घरकुलांपैकी 417 घरकुले अपूर्ण आहे. पारधी आवास योजनेंतर्गत दोन घरकुल मंजूर असून दोघेही अपूर्ण आहे. या घरकुल योजनेसाठी गत 2016 पासुन कामे सुरू आहेत.
तालुक्यात चार हजार 353 घरकुले मंजूर
रावेर तालुक्यात केंद्र व राज्यातर्फे चार हजार 353 घरकुले मंजूर असून त्यापैकी तीन हजार 540 घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. अद्याप तालुक्यात विविध योजनेची 813 घरकुले अपूर्ण आहेत.



