कर्जाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या


अमळनेर : कर्जाला कंटाळून 53 वर्षीय शेतकर्‍याने आत्मत्या केली. दापोरी बु.॥ येथे गुरुवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पंढरीनाथ काशीनाथ पाटील (53) असे आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याचे नाव आहे. सुमारे 10 बिघे शेतजमीन असलेल्या शेतकर्‍यावर विकास सोसायटीचे सव्वा दोन लाख पीक कर्ज थकलेले असून शेतीला लागणारा खर्च, घरखर्च आदी सांसारिक आर्थिक प्रपंच कसा भागवावा, या कारणाने ते नैराश्येचे जीवन जगत असताना त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, एक भाऊ, जावई, नातवंडे असा परीवार आहे.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !