रावेर पुरवठा प्रकरण : रेशन दुकानदारांचे जबाब पूर्ण


रावेर : रावेर पुरवठा विभागातील तत्कालीन पुरवठा अधिकार्‍यांच्या चौकशी प्रकरणात आतापर्यंत रावेर तालुक्यातील सुमारे 148 रेशन दुकानदारांचे जबाब मंडळ अधिकार्‍यांमार्फत नोंदवण्यात आले असून यापुढील कारवाईकडे आता लक्ष लागले आहे. शासकीय अर्जात परस्पर बदल करणे, अनुमती नसताना अर्ज छापून त्याची विक्री करणे, राजमुद्रा असलेला तहसीलदारांच्या शिक्क्यांचा गैरवापर करणे तसेच प्रति कार्ड तीन रुपयांप्रमाणे छापलेल्या अर्जांची विक्री करणे या कारणावरुन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तत्कालीन पुरवठा निरीक्षक हर्षल पाटील यांची बदली केली होती. या प्रकरणात आणखी कोणत्या अधिकार्‍यांनी कर्तव्यात कसूर केला व त्यांच्यावर काय कारवाई होते? याकडे आता लक्ष लागले आहे. या प्रकरणाची फैजपूर प्रांतधिकारी कैलास कडलग हे चौकशी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !