पाणीपुरवठा योजनेचे 24 जूनला काम सुरू करण्याची मुख्याधिकार्‍यांची ग्वाही


वरणगावात भाजपा पदाधिकार्‍यांचे उपोषण मागे : काम न सुरू केल्यास 1 जुलैनंतर तीव्र आंदोलनाचा इशारा

भुसावळ : वरणगाव शहरातील मंजूर पाणी पुरवठा योजनेचे काम तत्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारपासून वरणगाव नगरपरीषदेसमोर भासपा महिला आघाडीच्या वतीने उपोषण छेडण्यात आले. याप्रसंगी महाविकास आघाडीचा धिक्कार असो, पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे आदी घोषणांनी परीसर दणाणला. उपोषणस्थळी मुख्याधिकारी समीर शेख, पाणीपुरवठा अभियंता गणेश चाटे, प्रशासन अधिकारी प्रशांत सूर्यवंशी व आझाद पटेल उपोषणार्थींशी चर्चा केली. 24 जून रोजी मंजूर पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरूवात केली जाईल, असे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन
यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, महिला आघाडी अध्यक्षा प्रणिता पाटील चौधरी यांनी मुदतीत काम सुरू न झाल्यास पुन्हा 1 जुलैनंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुख्याधिकार्‍यांशी बोलताना दिला.




यांचा आंदोलनात सहभाग
महिला आघाडीच्या शहराध्यक्षा प्रणिता पाटील-चौधरी, माजी नगरसेविका माला मेढे, ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य रुख्मिणी काळे, कस्तुराबाई इंगळे, कमलबाई पाटील, रजनी भावसार, कमलबाई मोरे, गंगूबाई माळी, अलका धनगर, अनिता चांदणे, भाग्याश्री पाटील, वर्षा बढे, जयश्री अवतारे, मंदा थटार, मीनाक्षी पालवे, अर्चना माळी, उषा पवार, दुर्गाबाई तायडेख, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, ज्येष्ठ नेते हाजी अल्लाउद्दीन सेठ, शहराध्यक्ष सुनील माळीख, संजय कुमार जैन, अजय पाटील, तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर, गोलू राणे, हितेश चौधरी, माजी सरपंच सुभाष धनगर, कृष्णा माळी, संदीप माळी, दत्तू मराठे, मनोहर सराफ, अंभोरे, डॉ.प्रवीण चांदणे, डॉ.सादीक जावेद शाहा, फहिम शेख, डी.के.खाटीक, रमेश पालवे, मिलिंद भैसे, पप्पू ठाकरे, जयेश कपाटे, रॉक कश्यप, दीपक चौधरी, किरण वंजारी, राहुल जंजाळे, तेजस जैन, लखन माळी, नथ्थू पवार, गंभीर माळी, नाना सुरळकर यांच्यासह असंख्य महिला व नागरीक उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !