अज्ञात वाहनाने उडवले : तिघांचा मृत्यू
नांदेड : नांदेड : ते नायगाव महामार्गावरील धनेगाव चौकात अज्ञात वाहनाने दुचाकीला उडवल्यानंतर झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. गुरुवारी मध्यरात्री हा अपघात झाला. या अपघातात विनोद दर्शने (19), लंकेश गवाले (21, दोघे रा.मारतळा, ता.लोहा) व कंधार तालुक्यातील गऊळ येथील सतीश देवकांबळे (20) यांचा मृत्यू झाला. तिघे जण चंदासिंघ कॉर्नरकडून जुन्या पुलाकडे जात असलेल्या अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला.


