कुर्‍हेपानाचेत 22 जून रोजी रोजगार मेळावा


भुसावळ : कुर्‍हा येथील आदर्श हाय-टेक आय.टी.आय. व महाजन आय.टी.आय.रावेर यांच्या मंगळवार, 22 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन कुर्‍हापानाचे येथील आदर्श आयटीआयच्या आवारात करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच या वेळेत हा मेळावा होईल तर सकाळी आठ ते दहा या वेळात रजिस्ट्रेशन करता येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावाख, असे आवाहन आदर्श हायटेक आय.टी.आय.चे प्राचार्य एस.के.कुरेशी तसेच महाजन आय.टी.आय.रावेरचे प्राचार्य ए.बी.तडवी यांनी केले आहे.

19 कंपनीमार्फत रोजगार भरती
या रोजगार मेळाव्यात नाशिक जिल्ह्यातील एकूण 19 कंपनी मार्फत नोकर भरती केली जाणार आहे. ए.आय.सी.ई.च्या निम कार्यक्रमांतर्गत एबीबी सातपूर, आनंद आय पॉवर, सातपूर, फायनेक्स किचन, अंबड, गँबरील इंडिया, अंबड , जीएमपी रेल्स, ओझर, होल डेक्स, अंबड, हिंद रेक्टरीफायर, सातपूर, इनोव्हा रबर, अंबड, नॅश ग्रुप, सातपूर अदी कंपन्यांमध्ये बेरोजारांची भरती केली जाणार आहे. मेळाव्यात आय.टी.आय.पास, अ‍ॅप्रेंटीसशीप, ट्रेनी तसेच सर्व ट्रेड धारकांसाठी हा मेळावा आहे. पात्र उमेदवारांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले असून उपस्थितीवेळी मास्क लावावा तसेच सोशल डिस्टन्स पाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !