शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त विभागात विविध कार्यक्रम


भुसावळ : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमि भुसावळसह विभागात शिवसेनेतर्फे विविध कार्यक्रम राबवण्यात आले. वरणगाव शहर शिवसेनेतर्फे शनिवारी दुपारी 12 वाजता शिवभोजन केंद्र, वरणगाव येथे गोड पदार्थ म्हणून मोतीचूर लाडूचे वाटप करण्यात आले. बस स्थानक चौकातील शिवभोजन केंद्रावर 100 लाभार्थांसह बसस्थानक चौकात उपस्थित नागरीकांना देखील वरणगाव शहर शिवसेनातर्फे मोतीचूर लाडू वाटप करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे, अल्पसंख्यांकांचे उपजिल्हा संघटक सईद मुल्लाजी, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, सुभाष चौधरी, सुरेश चौधरी, सय्यद हिप्पीशेठ, अब्रार खान, साईचरण चौधरी, शिवभोजन केंद्राचे संचालक संतोष माळी, निलेश ठाकूर, हर्षल वंजारी, सागर वंजारी, दिपक पाटील, तुषार चौधरी, राहुल वंजारी, अतुल पाटील, कैलास पाटील, रोहित वंजारी, अब्बू खान, फरहान खान, शेख समीर, अझहर खान, निलेश काळे, विभाग प्रमुख राम शेटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




यावल शहरात अन्नदानाचा कार्यक्रम
यावल : गोळीबार टेकडीवरील आदिवासी पाड्यातील नागरीकांना अन्नदान करण्यात आले. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व पक्षाचे तालुकाप्रमुख रवी सोनवणे, माजी तालुकाप्रमुख कडु पाटील, शिवसेना आदिवासी सेलचे तालुकाप्रमुख हुसैन जहांगीर तडवी, यावल शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, गोटु सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनिल बारी, पप्पू जोशी, सागर देवांग, तालुका प्रसिद्धी प्रमुख संतोष वाघ, पराग कोळी, निलेश पाराशर, अजहर खाटीक, मोहसीन खान, संतोष बारी, राजु शेख, सुधाकर धनगर, विष्णू आवरे, सचिन कोळी, गजु भोसले, किरण बारी, सागर बोरसे, योगेश चौधरी, यशवंत चौधरी, गायनसिंग बारेला राजू शेख, यावल शहर व तालुका शिवसेना, युवा सेना व विद्यार्थी सेना, एस टि कामगार सेना, शिक्षक सेना, आदिवासी सेना, अल्पसंख्यांकांचे सेना, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भुसावळात शिवभोजनाचा लाभ
भुसावळ : कट्टर शिवसैनिक व शिवभोजन केंद्र संचालक उमाकांत(नमा)शर्मा यांनी शिवभोजन केंद्र पूर्णपणे भगवेमय केले. गरजू लोकांना दाल, चावल,रोटी, मटर-पनीर, रसगुल्ला, देशी घीचे बेसन लाडू शिवथाळीत देण्यात आले. दरम्यान, आतापर्यंत या योजनेचा एका वर्षात 80 हजार नागरीकांनी घेतला आहे. दररोज 190 नागरीकांना जेवण दिले जाते तर गेल्या तीन महिन्यांपासून शिवभोजन फ्री दिले जात असल्याची माहिती शिवसैनिक व शिवभोजन केंद्र संचालक उमाकांत (नमा) शर्मा यांनी दिली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !