चेन्नई-एग्मोर जोधपूर व ओखा एक्स्प्रेसला विशेष गाडीला मुदतवाढ


भुसावळ : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी 06067 चेन्नई एग्मोर-जोधपूर विशेष गाडीला 3 जुलै ते 6 नोव्हेंबरदरम्यान मुदतवाढ देण्यात आली तसेच 06068 जोधपुर-चेन्नई-एग्मोर विशेष गाडीला 5 जुलै ते 8 नोव्हेंबरदरम्यान मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, 06733 रामेश्वरम-ओखा एक्स्प्रेसला 2 जुलै ते 5 नोव्हेंबरदरम्यान मुदवाढ देण्यात आली तसेच 06734 ओखा-रामेश्वरम विशेष गाडीला 6 जुलै ते 9 नोव्हेंबदरम्यान मुदतवाढ देण्यात आली. केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये प्रवासाची परवानगी मिळेल शिवाय प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !