पिस्तुलाच्या धाकावर नवदाम्पत्याला लुटले


बोदवड : रावेर तालुक्यातील चोरवड येथील नवविवाहित दाम्पत्य उजनी दर्ग्यावर दर्शनासाठी आल्यानंतर परतीच्या प्रवासात असताना जंगलात चौघांनी पिस्तुलाचा धाक दाखवत दाम्पत्याला झाडाला बांधून लुटल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.

पिस्तुलाच्या धाकावर केली लूट
तरुण राहुल विलास घेटे हा पत्नी सरलासह शुक्रवारी दुचाकीने उजनी दर्ग्याच्या दर्शनासाठी आल्यानंतर दुपारी 12 वाजेच्या सुमारास घराकडे परतत असताना जंगलातून अचानक दबा धरून असलेले चौघे समोर आले व त्यातील एकाने विवाहितेवर र पिस्तूल रोखले. इतर तीन जणांनी दोघांना झाडाला बांधून मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्याकडील दागिने काढून घेतले. विवाहितेच्या गळ्यातील दहा हजारांचे मंगळसूत्र, तीन हजारांचा मोबाइल, तर राहुलकडील 13 हजार रुपयांचा मोबाइल हिसकावण्यात आला तसेच खिशातून पाच हजार चारशे रुपये रोख मिळून एकूण 32 हजार रुपये काढून घेण्यात पैसे मिळाल्यावर या चारही जणांनी या दाम्पत्याला सोडून दिले. शनिवार, 19 रोजी रात्री 12 वाजता या लूटप्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. बोदवड पोलिसांनी रात्री चारपैकी तीन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.




 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !