वरणगावात पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन


24 तास पाणीपुरवठा करण्याचा शब्द पाळणार : भुसावळचे आमदार संजय सावकारे यांची ग्वाही ; भाजपाने आंदोलनामुळेच लागले योजनेचे काम मार्गी : माजी नगराध्यक्ष सुनील काळे

भुसावळ : तालुक्यातील वरणगाव शहरासाठी मंजूर असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन सोमवारी आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते कुदळ मारून करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून कामाला ब्रेक लागल्याने भाजपाने अनेकदा आंदोलने मात्र अखेर योजनेचे काम मार्गी लागल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. दरम्यान, यावेळी आमदार संजय सावकारे म्हणाले की, वरणगावकरांना 24 तास पाणी मिळण्यापासून आता कुणीही रोखू शकत नाही. भाजपाने जनआंदोलन केल्यानेच शासनाला दखल घ्यावी लागली व योजना कामाला गती मिळली. योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले.

यांची होती उपस्थिती
योजना कामाच्या भूमिपूजनप्रसंगी माजी मंत्री आमदार संजय सावकारे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, मुख्याधिकारी समीर शेख, गणेश चाटे, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाख शेख युसूफ, माजी नगरसेविका माला मेढे, मेहनाज बी.पिंजारी, रुख्मिणी काळे, प्रणिता पाटील-चौधरी, सुनील माळी, हाजी अल्लाउद्दीन सेठ, अ‍ॅड.ए.जी.जंजाळे, माजी सरपंच सुभाष धनगर, कृष्णा माळी, संदीप माळी, डॉ.प्रवीण चादणे, दत्तू मराठे, मिलिंद भैसे, शामराव धनगर, गोलू राणे, नटराज चौधरी, रमेश पालवे व नागरीक उपस्थित होते.




महाविकास आघाडीने आणला अडथळा : सुनील काळे
माजी नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले की, मंजूर वरणगाव पाणीपुरवठा योजना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, माजी मंत्री संजय सावकारे यांच्या प्रयत्नांनी मंजूर झाली मात्र महाविकास आघाडीने स्थगिती आणून अडथळे आणले मात्र भाजपाने रस्ता रोको, जलसमाधी उपोषण, हंडा मोर्चा आणला तसेच गत शुक्रवारी महिला आघाडीतर्फे आमरण उपोषण करण्यात आले व त्यानतंर प्रशासनाने 24 जूनच्या आत पाणी योजनेच्या कामाला सुरुवात करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आज योजनेच्या कामास प्रत्यक्षात सुरूवात झाली. योजनेेचे काम सुरू होण्याचे श्रेय भाजपा कार्यकर्त्यांना असून व 24 तास पाणी वरणगावकरांच्या घरात पोहेाचविल्याशिवाय शांत बसणार नाही, असेही माजी नगराध्यक्ष सुनील काळे यावेळी म्हणाले. यावेळी भाऊलाल टिंटोरे, किरण वंजारी, कमलाकर मराठे, तेजस जैन, कामगार नेते मिलिंद मेढे, कुंदन माळी, संगीता माळी, जयश्री अवतारे, कस्तुराबाई इंगळे यांच्यासह असंख्य महिला व नागरीक उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !