रावेर तहसील कार्यालयात दोघांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी


रावेर : जमिनीच्या वादावरुन नायब तहसीलदार यांच्या कक्षात दोन शेतक-यांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी झाल्याने एकच खळबळ उडाली. ही हाणामारी बघण्यासाठी तहसील कार्यालयात एकच गर्दी जमा झाली. रावेर तहसील कार्यलयात सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मनोहर पाटील (भोपाळ) व मधुकर पाटील (गहुखेडा) यांची जमीन नावावर लावण्यासाठी येथील निवासी नायब तहसीलदार सी.जी.पवार यांच्या कक्षात दोघांच्या उपस्थितीत सुनावणी सुरू होती. यावेळी मधुकर पाटील व मनोहर पाटील यांच्यात प्रथम शाब्दीक वाद झाला. त्या नंतर वादाचे रूपांतर फ्री-स्टाईल हाणामारीत झाली. ही हाणामारी पाहण्यासाठी एकच गर्दी जमा झाली. तत्काळ पोलिसांना बोलून दोघांना पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !