भुसावळात तीन हजारांची गावठी दारू जप्त
भुसावळ : शहरातील पंचशील नगरासह डेली बाजार भागात गावठी दारूची विक्री होत असल्याची माहिती बाजारपेठ डीबी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तीन स्वतंत्र कारवाई करीत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी पोलीस शिपाई प्रशांत परदेशी यांच्या फिर्यादीनुसार आरोपी सचिन दशरथ नरवाडे (पंचशील नगर) व कॉन्स्टेबल यांच्या फिर्यादीनुसार जीवन भास्कर कापडे आरोपी मनोज अशोक ताळेकर तसेच कॉन्स्टेबल ईश्वर भालेराव यांच्या फिर्यादीनुसार किशोर मनोहर चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तीन्ही कारवायांमध्ये आरोपींकडून दोन हजार 940 रुपये किंमतीची गावठी दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल वाल्मीक सोनवणे, रमण सुरळकर, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, जीवन कापडे, विकास सातदिवे आदींच्या पथकाने केली.




