साकेगावात हाणामारी : जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू


भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथे किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना रविवार, 13 जून रोजी रात्री उशिराने घडली. याप्रकरणी परस्परांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल झाले होते. या हाणामारीतील जखमी झालेल्या निलेश बळीराम सोनवणे (36, साकेगाव) यांचा सोमवारी दुपारी उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने साकेगावात शोककळा पसरली.

आरोपींच्या अटकेसाठी अपर पोलीस अधीक्षकांना निवेदन
दरम्यान, गुन्ह्यातील संशयीत आरोपींना अटक करावी या मागणीसाठी मंगळवारी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना निवेदन देण्यात आले. अटक न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नातेवाईक उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर अनिता सोनवणे, ललित सोनवणे, बळीराम सोनवणे, वर्षा सोनवणे, यामिनी सोनवणे, जगन्नाथ सोनवणे, मयुर सोनवणे, एकनाथ सोनवणे, तुषार सोनवणे, अर्जून सोनवणे, योगेश सोनवणे, सुरेश कोळी, रमेश काळी, मधुकर कोळी, किशोर कोळी, कैलास कोळी, पवन मोरे, मुकेश सानवणे, नामदेव सपकाळे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !