भुसावळात विद्युत इंजिन कारखान्यात 24 जुलै रोजी पेन्शन अदालत
भुसावळ : विद्युत इंजिन कारखाना, कारखाना लेखा अधिकारी कार्यालय आणि वरीष्ठ सामग्री प्रबंधक कार्यालय, भुसावळतर्फे सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी मंगळवार, 24 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता विद्युत इंजिन कारखान्यात पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित सेवानिवृत्त कर्मचार्यांनी त्यांचे अज बुधवार, 30 जूनपर्यंत मुख्य कारखाना प्रबंधक, विद्युत इंजीन कारखाना, मध्य रेल्वे यांच्या कार्यालयात तीन प्रती सह पाठवाव्यात व अर्जात सेवानिवृत्ती कर्मचार्यांची पूर्ण नाव आणि पत्ता, सेवा निवृत्तीच्या वेळी असलेला हुद्दा, सेवानिवृत्तीची तारीख आणि सेवानिवृत्तीचे कारण, समस्या विषयी संक्षिप्त माहिती, अंतिम वेतन आणि वेतनमान, पीपीओ क्रमांक, टोकन नंबर व पीएफ नंबर, पेन व मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




