पदोन्नतीत मिळावे आरक्षण : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय संघटनेची मागणी
भुसावळ : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे आमदार संजय सावकारे यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र शासनाने पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निघालेला जीआर रद्द करावा व मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे, या संदर्भात विधानसभेत पाठपुरावा करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष मिलिंद खंडारे, सचिव अख्तर तडवी, कार्याध्यक्ष रोशन वाघ, सहसचिव दीपक बागुल, नितीन सोनवणे, खजिनदार सतीश ढवळे, संघटनेचे सल्लागार एम.एम.पगवाड यांची प्रसंगी उपस्थिती होती. दरम्यान, पदोन्नतीमधील आरक्षण संपविण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाविरोधात 26 जून रोजी आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आक्रोश आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रसंगी सांगण्यात आले.




