जुन्या वादातून एकावर चाकू हल्ला
यावल : तालुक्यातील किनगाव येथे मागील भांडणाच्या कारणावरून सात जणांनी एकावर चाकू हल्ला केल्याची घटना 23 रोजी दुपारी एक वाजता घडली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सात जणांविरुद्ध गुन्हा
भावलाल पुंडलिक पाटील (55) यांचा गेल्या काही दिवसांपूर्वी गावातील प्रदीप इच्छाराम कोळी यांच्यात वाद झाला होता. तो राग मनात ठेवून 23 जून रोजी दुपारी एक वाजता भावलाल पाटील यांना प्रदीप कोळी यांनी मारहाण करीत चाकू मारला तर प्रदीप इच्छाराम कोळी, छाया प्रदीप कोळी, राधेश्याम उर्फ शामराव इच्छाराम कोळी, पिंटू शरद कोळी, सरलाबाई पिंटू कोळी, साहेबराव प्रभाकर ठाकूर (सर्व रा. किनगाव) यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. भावलाल पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र खैरनार करीत आहे.



