बोदवडला ओबीसी आरक्षणासाठी भाजपाचे ‘चक्काजाम आंदोलन’
बोदवड : महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याने ओबीसी समाजावर अन्याय झाल्याची भावना भाजपा पदाधिकार्यांनी व्यक्त करीत बोदवडला तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. पदाधिकार्यांनी शनिवारी सकाळी मलकापुर चौफुलीवर शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत चक्का जाम आंदोलन केले.
यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनस्थळी भाजपा तालुका सरचिटणीस अमोल देशमुख यांनी आंदोलनाची भूमिका सांगितली. आंदोलन यशस्वीतेसाठी अनंतराव कुलकर्णी, तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, तालुका सरचिटणीस अमोल देशमुख, राजेंद्र डापसे, शहरायक्ष नरेश आहुजा, डॉ.ब्रिजलाल जैन, चरणसिंग पाटील, दिलीप घुले, भागवत चौधरी, धनराज सुतार, वैभव माटे, संजय अग्रवाल, संतोष चौधरी, भूषण देशमुख, सचिन जैस्वाल, निलेश देशमुख, राम आहुजा, शरद माटे, रोहित अग्रवाल, अशोक झाबक, युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम वरकड, विक्रमसिंग पाटील, संजय बडगुजर, पंकज चांदूरकर, उमेश गुरव, मयुरेश शर्मा, प्रदीप डुंगरवाल, बलराम आहुजा, महेंद्र पाटील यांनी परीश्रम घेतले.




