ओबीसींचे आरक्षण संपवणार्‍या मोदी सरकारचा चोपड्यात काँग्रेसतर्फे निषेध


चोपडा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष भैय्यासाहेब अ‍ॅड.संदीप सुरेश पाटील यांच्या आदेशान्वये चोपडा शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने चोपडा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवार, 26 जून 2021 रोजी मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. सुप्रीम कोर्टाने ओबीसींची आकडेवारी मागितली होती परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी लपवून ठेवली त्यामुळे ओबीसींचे आरक्षण रद्द झाले. याला सर्वस्वी जबाबदार केंद्राचे मोदी सरकार असल्याने मोदी सरकारचा निषेध करत ओबीसींच्या मागे त्यांच्या न्याय मागण्या मान्य होईपर्यंत चोपडा शहर आणि काँग्रेस ओबीसींच्या पाठीमागे उभी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

मोदी सरकारचा निषेध
यावेळी चोपडा शहर काँग्रेसचे अध्यक्ष के.डी.चौधरी म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने अघोषित आणीबाणी चालवलेली आहे. मोदी सरकारच्या विरोधात बोलल्यास त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याचे महापाप मोदी सरकार करत असून संविधानाचा घात करणार्‍या मोदी सरकारचा धिक्कार करत, मोदी सरकारचा निषेध केला.




यांचा आंदोलनात सहभाग
यावेळी चोपडा सूतगिरणीचे संचालक राजेंद्र भास्करराव पाटील, कांतीलाल सनेर, फातिमा पठाण, इलियास पटेल, मंगेश भोईटे, रमाकांत सोनवणे, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष किरण सोनवणे, देवकांत चौधरी, जितेंद्र चौधरी, हमीदखा रशीदखा पठाण, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मोदी सरकारचा निषेध असो, जय जवान जय किसान, छत्रपती शाहू महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, महात्मा गांधी की जय, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !