यावलला आरक्षणाच्या मागणीसाठी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन
यावल : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठीय ावल तालुका काँग्रेस अध्यक्ष व जिल्हा परीषद गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे आणि इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली यावल शहरात शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या सूचनेवरून व महाराष्ट्र उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन झाले.
ओबीसी आरक्षणाला केंद्रातील भाजपाच जवाबदार : काँग्रेसचे आंदोलन



यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनात यावल तालुका काँग्रेस उपाध्यक्ष अनिल जंजाळे, संदीप प्रभाकर सोनवणे, अजय बडे, शेख नईम शेख खाटीक, अकबर शहा, कलीम शेख, अशपाक शहा, अभिषेक इंगळे, नाना तायडे, इमरान पैलवान, नदीम भाई, समाधान पाटील, पुंडलिक बारी, राजू बारी, अविनाश बारी, विकी गजरे, उस्मान खाँ, कलीम खान, जावेद मेंबर, मनोहर सोनवणे, बशीर तडवी, नसीर शेख आयुब भाई, गोल्डन भाऊ आदी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले.

